Pune saam tv
Video

Pune News: पुण्यात पुन्हा एकदा अपघाताचा थरार! मद्यधुंद चालकाने कार थेट बसस्टॉपवर घातली|VIDEO

Another Pune Horror Averted as Drunk Driver: पुणे येथील भापकर पेट्रोल पंपाजवळ एका कार चालकाने दारूच्या नशेत गाडी थेट बस स्टॉपमध्ये चढवल्याची घटना घडली आहे.

Omkar Sonawane

पुणे: येथील एका कार चालकाने एकाचवेळी 12 विद्यार्थ्यांना भरधाव कार चालवत उडवून देण्याची घटना ताजी असतानाच आता अजून एक भयानक घटना समोर आली आहे. पुणे येथील भापकर पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बस स्टॉपजवळ दारूच्या नशेत एका कार चालकाने थेट गाडी बस स्टॉपवर घातली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुणे शहरामध्ये वारंवार अशा घटना घडताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ३० मे रोजी रात्री ११ वाजता पुणे - सातारा रस्त्यावरील पंचमी चौकाजवळ असलेल्या भापकर पेट्रोल बस स्टॉप वर घडला. कारचालक गणेश गोरख जेवे हा त्याच्या ताब्यातील (MH12 KT 4764) गाडी दारू पिऊन चालवत होता. अचानक त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने थेट गाडी बस स्टॉप वर चढवली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने तिथे प्रवासी नव्हते म्हणून अनर्थ टळला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन वाहन चालकाचा परवाना रद्द करण्यासाठी अहवाल पाठवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT