Pune News Saamtv
Video

Pune News : पालकांनो सावधान! पुण्यातील तब्बल १२ शाळा अनधिकृत, यादी जाहीर | Video

Pune Education Department : पुणे जिल्ह्यातील तब्बल १२ शाळा अनधिकृत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळांची यादी जाहीर केली आहे. तसंच सदर शाळांनी प्रवेश स्वीकारल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Saam Tv

पुणे जिल्ह्यात तब्बल १२ शाळा अनधिकृत आहे. या अनधिकृत शाळांची यादीच पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन देखील शिक्षण विभागाने केलं आहे. तर दुसरीकडे या शाळा सुरू केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील १२ शाळा अनधिकृत असल्याने या शाळा सुरू केल्यास होणार कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांचे नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाकडून १२ शाळांची नावे जाहीर केली असून, या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.तर अनधिकृत शाळांनी जर शाळा सुरू ठेवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिलाय. बारा शाळांनी प्रवेश घेणे तातडीने बंद करावेत. जाहिरात करणे बंद करावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

तेरा अनधिकृत शाळांची नावे -

१) श्रीनाथ इंग्लिश मीडिअम स्कूल, वीर, पुरंदर

२) जिजस क्राईस्ट इंग्लिश मीडिअम स्कूल, कामशेत

३) किंग्ज वे पल्बीक स्कूल, लोणावळा

४) शिव समर्थ इंग्लिश मीडिअम स्कूल, जांभुळवाडी

५) एंजल इंग्लिश मीडिअम हायस्कूल गणेश नगर, दत्तवाडी नेरे

६) चाणक्य ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट

७) अंकुर इंग्लिश मीडिअम स्कूल, मारुंजी

८) पेरिविंकल इंग्लिश मीडिअम स्कूल, पिरंगुट

९) इलाईट इंटरनॅशनल स्कूल, कासारआंबोली

१०) संस्कार प्रायमरीस्कूल इंग्लिश मीडिअम स्कूल, पिरंगुट

११) दिल्ली पब्लिक स्कूल, हिंजवडी

१२) मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, मांज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात NEET पेपर फुटी प्रकरणी पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक

Mumbai Tourism: गोव्याचा प्लान राहिला दूर! पहिल्यांदा मुंबईतील 'या' Hidden Beaches वर विकेंडला फिरून या

Mangal Gochar 2026: सूर्याच्या नक्षत्रात मंगळ ग्रह करणार गोचर; या ३ राशी कमावणार भरपूर पैसा

अखिलेश यादव यांच्या धाकट्या भावाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टम रिपोर्टमधून कारण समोर

Vijay Thalapathy: मुख्यमंत्र्यांनी विश्वास जिंकला, थलपती विजय यांना १४४ आमदारांनी केलं मतदान, कोणता पक्ष फुटला?

SCROLL FOR NEXT