Pune Dam Saam TV
Video

Pune : पुणेकरांसाठी खूशखबर! ४ धरणांमध्ये ४५ टक्के साठा| VIDEO

Khadakwasla Dam: खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. पुणेकरांसाठी ही बाब नक्कीच दिलासादायक ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे शहराला पाणिपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये यंदा समाधानकारक पावसामुळे एकूण १३.१६ टीएमसी म्हणजे ४५.१३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा फक्त ३.५७ टीएमसी म्हणजे १२.२४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणेकरांसाठी ही बाब नक्कीच दिलासादायक ठरणार आहे.धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच धरणांमध्ये पाणीसाठ्यात चांगली वाढ होताना दिसत आहे.

धरणनिहाय सध्याचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे –

खडकवासला – १.२३ टीएमसी

पानशेत – ४.४१ टीएमसी

वरसगाव – ६.४० टीएमसी

टेमघर – १.११ टीएमसी

पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आगामी काळात पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता असून, प्रशासनानेही जलसाठ्यावर लक्ष ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

SCROLL FOR NEXT