पुणे न्यायालय फसवणूक नाना पटोले Saam Tv
Video

Maharashtra Budget: "महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय?" पुणे न्यायालयाच्या बोगस निकालावरुन नाना पटोले विधानसभेत आक्रमक

Saam Tv Impact: पुणे न्यायालयात न्यायाधीशाची खोटी सही करून जामीन मिळवल्याच्या धक्कादायक घटनेने न्यायव्यवस्था हादरली. साम टीव्हीने या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या आरोपींचा पर्दाफाश केला. त्यानंतर आज विधानसभेत याचे पडसाद उमटले.

Omkar Sonawane

न्यायव्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या सामच्या बातमीचे विधानसभेत आज पडसाद उमटले. काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी साम टीव्हीने उघडकीस आणलेल्या बातमीचा विधानसभेत मुद्दा उपस्थित करून खोटा निकाल तयार करण्याची हिंमतच कशी होते. असा सवाल त्यांनी यावेळी विधानसभेत विचारला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चौकशी करुन दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सरकारला दिले.

पुणे न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या आदेशाची खोटी ऑर्डर सादर करत एका प्रकरणातील आरोपींनी जामीन मिळवला आहे. ही धक्कादायक घटना घडलीय ती शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात. सही असलेली एक खोटी ऑर्डर जोडून फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपींनी चक्क मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल केली. या सर्व प्रकरणाचा काल साम टीव्हीने पर्दाफाश केला. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले. या सर्व घटनेची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील दखल घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT