Voter List Controversy x
Video

CCTV : भाजपकडून बंद खोलीत ४.३० तास बसून मतदार यादीत फेरफार, काँग्रेस नेत्याने पुरावाचे दाखवले

voter list manipulation : पुण्यातील महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी बंद खोलीत बसून मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे.

Namdeo Kumbhar

Congress claims BJP altered municipal voter rolls : पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने भाजपवर गंभीर आरोपांची मालिकाच सुरू केलीय. भवानी पेठ येथील महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात भाजप कार्यकर्ते बंद खोलीत तब्बल ४.३० तास बसून मतदार याद्यांमध्ये फेरफार करत असल्याचे काँग्रेस नेते संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि याचे पुरावे सुद्धा दिले. महाविकास आघाडीने सीसीटीव्ही फुटेजदेखील पत्रकार परिषदेत दाखवत भाजपावर आरोप केले. प्रारूप मतदार याद्या जाहीर होण्याच्या २० दिवस आधीपासूनच हा प्रकार सुरू होता, तसेच याद्या ठेवलेल्या खोल्या बंद करून त्या चाळणे व बदल करणे असे प्रकार अनेक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झाले असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप करत आघाडीने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT