Supporters of sitting and former MLAs clash outside a polling booth in Bhor as tensions escalate during voting. Saam Tv
Video

मतदान केंद्रावर दोन गटांत तुफान राडा! आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले|VIDEO

Chaos In Bhor On Polling Day: भोरमध्ये आजी व माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी, शाब्दिक वाद, धक्काबुक्की यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Omkar Sonawane

पुण्यातील भोरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भोरमध्ये दोन गटांत तुफान राडा झाल्याची माहिती मिळत आहे. आजी आणि माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाल्याचे समजते. विद्यमान आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांची मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली असून तणावाचे वातावरण आहे.

कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचे पहायला मिळाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भोरच्या अनेक भागात कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतदानाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या राड्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नक्की काय घडलं आणि वाद कशामुळे झाला, याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, दोन गटांतील या संघर्षामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदान केंद्राबाहेर छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी|VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : मनमाड शहरात मोठा राडा, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले

Wedding Varat Ritual: लग्नानंतर नवरा आणि नवरीची वरात का काढतात?

Sangli: पाटलांच्या समर्थकांचा राडा, मतदान केंद्राबाहेर भाजप- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; VIDEO व्हायरल

Nagar Parishad Update : ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाबाबत ईव्हीएम हटाव सेनेचा संताप

SCROLL FOR NEXT