Pune Saam TV
Video

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

Bhide Pull : पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे.नदीपात्रातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे. पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत पादचारी मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने हे काम गतीमान करण्यासाठी पूल काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.नदीपात्रातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. गणेशोत्सव काळात वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पुलावरील काम थांबवून तो तात्पुरता प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, आता काम पुन्हा सुरू झाल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने नागरिकांना संभाजी पूल आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल वापरण्याचे आवाहन केले आहे. भिडे पूल बंद झाल्यामुळे डेक्कन आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitafal khanyache Fayde: सिताफळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणते?

Aadhaar Card Update : आधार कार्डवर नाव किंवा आडनाव बदलायचे आहे? UIDAI ची ही सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Sleep Problems: रात्री गाढ झोप लागत नाही? 'या' ७ कारणांमुळे होऊ शकते झोप खराब; जाणून घ्या उपाय

Maharashtra News Live Update: फ्लाय ९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

SCROLL FOR NEXT