Pune Air Quality
Video

Pune Air Quality : पुणेकरांनो काळजी घ्या! मुंबईपेक्षाही हवा झाली खराब, श्वसनाच्या आजारांना निमंत्रण

Pune Air Quality Drops : पुण्यातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असून AQI १९१ नोंदवला आहे. शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव आणि कात्रज येथे धुलीकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले.

Namdeo Kumbhar

पुण्यातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून, हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १९१ वर पोहोचला आहे. एका अहवालानुसार, पुण्याचा प्रवास आता दिल्लीच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. हवेतील धूलिकणांचे वाढते प्रमाण नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. सलग दुसऱ्या वर्षी पुण्यात तीन दिवस हवेची गुणवत्ता अत्यंत खराब नोंदवली गेली आहे. मुंबईपेक्षाही पुण्याची हवा अधिक प्रदूषित झाल्याचे या बातमीतून स्पष्ट होत आहे.

हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने श्वसनाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.महापालिकेने विविध संशोधन संस्थांच्या सहभागातून संकलित केलेल्या माहितीतून हा निष्कर्ष पुढे आला आहे. शिवाजीनगर,लोहगाव,कात्रज,पाषाण या चार प्रमुख भागातील वर्षभरातील हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारी प्रसिद्ध केली असून चारही ठिकाणी हवेतील धुलीकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे अहवालात स्पष्ट झाले..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हाला पण मारणार, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत विनवणी

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT