Pune News SaamTv
Video

Pune News : एक छोटी चूक, अन् झालं होत्याचं नव्हतं! सीएनजी पंपावर घडला धक्कादायक प्रकार|VIDEO

CNG Pump Accident : पुण्याच्या तीन हत्ती चौकात असलेल्या सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यासोबत दुचाकीत सीएनजी भरताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Saam Tv

एका छोट्या चुकीमुळे सीएनजी पंपावरच्या एका कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. ही सर्व घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पुण्याच्या तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला त्याचा डोळा कायमचा गमवावा लागला. याप्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरे व राहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत हर्षद गणेश गेहलोत (रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) या कर्मचाऱ्याला डोळा गमवावा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षद हे पंपावर सीएनजी भरण्याचे काम करतात. रविवारी सायंकाळी ते एका दुचाकीमध्ये गॅस भरत होते. यावेळी अचानक गॅसचे नोझल त्यांच्या तोंडावर उडाले. यामध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन त्यांना डोळा गमवावा लागला. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप चव्हाण तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : शंकराची कृपा राहील! 5 राशींची भरभराट होणार, पैसा खर्च करताना काळजी घ्या; वाचा सोमवारचे राशीभविष्य

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT