Pune Nashik News SaamTv
Video

Pune Crime News : आरोपीला फासावर लटकवा! राजगुरूनगरच्या संतप्त नागरिकांनी रोखला पुणे - नाशिक महामार्ग | VIDEO

Rajgurunagar News Update : पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये झालेल्या दोन चिमूकल्या मुलींच्या हत्येनंतर आता नागरिकांनी संतप्त होत आज राजगुरूनगर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं.

Saam Tv

राजगुरूनगर येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आता राजगुरूनगर शहरात उमटताना दिसत आहेत. आज या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी आंदोलन केलं आहे. राजगुरूनगर पोलीस स्टेशन बाहेर पुणे नाशिक महामार्गावर आंदोलकांनी आंदोलन केल्याने हा महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद होता. यावेळी वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या.

पुण्याच्या राजगुरूनगर येथे घराबाहेर खेळत असताना दोन चिमुकल्या बहीणी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह एका पिंपामध्ये आढळून आले होते. या मुलींची हत्या पीडित कुटुंबाच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्याने केल्याचं पोलिस तपासातून उघडकीस आलं. या घटनेने आता नातेवाईक आणि राजगुरूनगर शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज राजगुरू पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी पुणे नाशिक महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT