Private travels bus catches fire near Champa in Nagpur saam tv
Video

Bus Fire: 50 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग

Private Bus Fire : नागपूरहून उमरेड-पवनीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला चांपा परिसरात अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ५० हून अधिक प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

Bharat Jadhav

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूरहून उमरेड-पवनीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला आज सायंकाळी सुमारे ४ वाजता चांपा परिसरातील इंडियन पेट्रोल पंपाजवळ अचानक आग लागली. या घटनेत बसच्या आतील ५० हून अधिक प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि जीवितहानी टळली.

प्राथमिक माहितीनुसार, बस नागपूरहून उमरेड-पवनी मार्गावरून प्रवास करत असताना चांपा येथील पेट्रोल पंपाजवळ आग लागली. आगीचा धूर आणि ज्वाला पाहताच चालकाने बसला बाजूला घेतले आणि प्रवाशांना बाहेर येण्यासाठी मदत केली. प्रवाशांनीही शांत राहून सहकार्य केल्यामुळे सर्वांना वेळीच बाहेर पडता आले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले असून चौकशी सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमित शाहांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा; ओमराजे निंबाळकर केंद्रात मंत्री होणार? 45 मिनिटांच्या चर्चेत नेमकं काय घडलं?

विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय हालचालींना वेग, आघाडीचा चेंडू प्रियंकांच्या कोर्टात, पक्षप्रमुखांशी चर्चा करणार

'गिरीश महाजन संकटमोचक आहे, पण लय लफडेबाज माणूस'; गुलाबराव पाटलांचं विधान

Maharashtra News Live Update: जुहू कोळीवाडा स्मशानभूमीजवळ व्हीबीएसएल साइटवर क्रेन कोसळली

Fact Check: 'द रॉक'ला टीबीची लागण? टीबीमुळे हट्टाकट्टा रॉक झाला हाडकुळा?

SCROLL FOR NEXT