Ajit pawar and Yugendra Pawar Saam tv
Video

Maharashtra Election: अजित पवारांविरोधात प्रतिभा पवार मैदानात; दादांचा सवाल, पवारांचा पलटवार

Maharashtra Election: राज्यात लाडक्या बहीणीची जोरदार चर्चा सुरु असतानाच बारामतीत मात्र अजित पवारांच्या लाडक्या काकीने दादांविरोधात प्रचार करायला सुरुवात केलाय.. त्यामुळे दादांनी नाराजी व्यक्त केलीय.. दादा नेमकं काय म्हणाले आणि शरद पवारांनी त्यांना काय उत्तर दिलं? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

बारामती विधानसभेत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत रंगतदार टप्प्यावर पोहचलीय. अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार मैदानात उतरल्या आहेत. त्यावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलीय. तर काकी कधीच प्रचारासाठी बाहेर पडल्या नाहीत. मग आता नातवाचा एवढा पुळका का? असा प्रश्न निवडणुकीनंतर काकींना विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय... तर प्रतिभा पवार या मी सोडून सगळ्यांच्या प्रचाराला फिरायच्या, असं म्हणत शरद पवारांनी पलटवार केलाय..

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात संपूर्ण पवार कुटुंब मैदानात उतरलं होतं. त्यावेळी अजित पवारांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीतूनच सुप्रिया सुळेंना तब्बल 48 हजार मतांचं लीड मिळालं होतं. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ आहेत. त्यातच आता लाडक्या प्रतिभा काकींचा विरोधातील प्रचार दादांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.. त्यामुळे पवार कुटुंबाने केलेली कोंडी दादा फोडणार की भावनिक साद घालून एकटे खिंड लढवणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT