Transport Minister Pratap SarnaiK warns to remove Dahisar Toll Plaza himself if not shifted by November 13. Saam Tv
Video

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

Dahisar Toll Relocation Deadline: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएसआरडीसीला थेट इशारा दिला आहे. १३ नोव्हेंबरपर्यंत दहिसर टोलनाका हलवला नाही, तर तो स्वतः उखडून टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Omkar Sonawane

दहिसर टोलनाक्याच्या स्थलांतराला होणाऱ्या विलंबावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक झाले आहेत. एमएसआरडीसीने (MSRDC) आदेश देऊनही ठेकेदार टोलनाका हलवत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जर ठेकेदार हा टोलनाका हटवत नसेल, तर त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करणं गरजेचं आहे, असे सरनाईक म्हणाले. ८ नोव्हेंबरची मुदत टळल्यानंतर आता १३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका वर्सोवा ब्रिजच्या पुढे हलवला नाही, तर शिवसैनिक म्हणून तो स्वतः उखडून टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. यापूर्वीही सरनाईक यांनी टोलनाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर अनेकदा आवाज उठवला आहे. मात्र आता त्यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) हा प्रस्ताव नियमांनुसार नसल्याचे सांगत नाकारल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT