Prashant Koratkar grants Bail by Kolhapur Session court saam tv
Video

Prashant Koratkar Bail : प्रशांत कोरटकरला जामीन, पण तुरुंगातून सुटका नाहीच, कारण काय?

Prashant Koratkar Grants Bail by Kolhapur Court : छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मात्र, तुरुंगातील मुक्काम कायम राहणार असल्याची शक्यता आहे. कारण काय?

Nandkumar Joshi

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे. कोल्हापूर कोर्टानं त्याला जामीन दिला. मात्र, जामीन मिळूनही कोरटकरची लगेच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता कमी आहे, असे सांगितले जात आहे.

छत्रपती शिवरायांबद्दल अपमानास्पद वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर वादात सापडला होता. कोल्हापूरसह राज्यातील विविध ठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. कोरटकरविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. मात्र, कोरटकर हा फरार होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणातून अटक केली होती. दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर करताना त्याच्याविरोधात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. आंदोलकांनी त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध केला होता. तर काहींनी त्याच्यावर चिल्लर फेकली होती. एका वकिलानं त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

प्रशांत कोरटकर न्यायालयीन कोठडीत होता. त्याला आज, बुधवारी कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन दिला. मात्र, कोरटकर तुरुंगातून लगेच बाहेर येऊ शकणार नाही असे बोलले जाते. तुरुंगाबाहेर येण्यास त्याला अजून दोन दिवस तरी लागतील, असेही सांगितले जाते. कोर्टात त्याच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आज ती पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तसेच उद्या महावीर जयंतीमुळे सुट्टी आहे. त्यामुळे आज प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर, त्याची सुटका शुक्रवारवर जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT