Prashant Koratkar 
Video

Prashant Koratkar : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा कोरटकर दुबईला पळाला? फोटो तुफान व्हायरल| VIDEO

Prashant Koratkar News : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्याविरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत, पण तो दुबईला पळाल्याचे मोर आलेय.

Namdeo Kumbhar

Prashant Koratkar In Dubai : गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे. कोरटकर कोलकातामार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे. कोरटकरचा दुबईतला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवरायांबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही.त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तो दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई हायकोर्टात दिलासा न मिळाल्याने प्रशांत कोरटकर दुबई पळून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरटकर हा कोलकाता मार्गे दुबई गेला असावा. दुबईमधील प्रशांत कोरटकर याचा एक फोटो व्हायरल होत आहे. प्रशांत कोरटकरपण पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात जमीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात कोरटकरने धाव घेतली असून यासंदर्भात सुनावणी सोमवारी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT