Voters queue up at polling booths in Latur district amid high political stakes during ZP and Panchayat Samiti elections Saam Tv
Video

माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात कोणाची सत्ता, एक्झिट पोलच्या अंदाजाने धाकधूक वाढली|VIDEO

Latur Zp Election Exit Poll Results Analysis: लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना समोर आलेल्या एक्झिट पोलनं राजकीय धाकधूक वाढवली आहे.

Omkar Sonawane

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रत्यक्षात सुरू झाली. जिल्ह्यातील एकूण 14 लाख 91 हजार मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. जिल्हा परिषद गटासाठी 242 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 419 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुपारी 1.30 वाजेपर्यंत लातूर जिल्ह्यात 35.94 टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती आहे. लातूर जिल्हा हा माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा जिल्हा असून महापालिकेतही काँग्रेसने सत्ता कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार जिल्हा परिषदेत पुढीलप्रमाणे जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे

काँग्रेस : 21, भाजप : 20, अजित पवार गट : 8, शिंदे सेना : 3, इतर : 3, शरद पवार गट : 2, वंचित बहुजन आघाडी : 2, ठाकरे सेना : 1.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंदु राष्ट्र बनवण्याची शेवटची आणि उत्तम संधी: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं विधान

अमेरिका इराण युद्धाच्या भारताला झळा, महागाईचा भडका, गॅस 114 रुपयांनी महागला

रशियाचा इराणला पाठिंबा, युद्धाचा भडका उडणार, रशियाचं 'स्पेशल इंटेलिजन्स' इराणच्या मदतीला?

Maharashtra Politics: नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंनी डाव साधला, भाजपसह राष्ट्रवादी चीतपट; बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

आजची रात्र, आखाती युद्धातील काळरात्र ? जगाला हादरा बसणार?

SCROLL FOR NEXT