Devendra Fadnavis And Eknath Shinde saam tv
Video

Maharashtra Politics : महायुती फुटणार? पडद्यामागं नेमकं चाललंय तरी काय? VIDEO

BJP - Shivsena Mahayuti Dispute : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच, आता महायुतीत काही आलबेल नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

Saam Tv

वैद्यकीय कक्षावरून महायुतीचं 'आरोग्य' बिघडलं असतानाच, आता सुरक्षेतील कपातीवरून महायुती 'सलाइन'वर असल्याचं चित्र निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. राज्यातील ज्या मंत्री आणि आमदारांच्या जीवाला धोका नाही त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. वाय प्लस सुरक्षा असलेल्या मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असून, काही आमदारांची सुरक्षाच काढून घेतली जाणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात केली आहे. सुरक्षेत कपात केल्याने शिंदे यांच्या शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळते.

कोणकोणत्या मुद्द्यांवरून भाजप-शिवसेनेत शीतयुद्ध?

एसटी महामंडळ अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नेमणूक केली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाराज झाल्याची चर्चा

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी केली.

आपत्ती व्यवस्थापन समितीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मात्र, एकनाथ शिंदेंचा समावेश नव्हता. त्यानंतर शिंदेंसाठी नियमांत बदल करण्यात आला.

परस्पर निर्णयांबाबत उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मला हलक्यात घेऊ नका असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला होता. पण त्यानंतर शिंदेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिल्याचं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना शिंदेंकडून स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT