BJP–Thackeray Sena Clash in Sambhajinagar Saam Tv
Video

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये भाजप- ठाकरेसेनेत राडा, पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी शिवसेनेचे ३ सदस्य गायब

BJP–Thackeray Sena Clash in Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा झाला आहे. पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे ३ सदस्य गायब झाले. अंबादास दानवे यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते.

Priya More

छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे ३ सदस्य अचानक गायब झाले. भाजपने तीन पंचायत समितीचे सदस्य पळवल्याचा आरोप ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या निवडणुकीपूर्वी पंचायत समिती परिसरात राडा झाला. भाजप आणि ठाकरेसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

पंढरपूर गणाच्या सदस्य लताबाई कानडे, वडगाव कोल्हाटी 101 गणाचे सदस्य सतीश हिवाळे, वडगाव कोल्हाटी 102 गणाचे सदस्य दत्तात्रय वर्पे हे ३ सदस्य गायब झाले आहेत. राज्याचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेनेचे ३ पंचायत समिती सदस्य पळवून नेल्याने वाद झाल्याचे पंचायत समिती परिसरात जोरदार राडा झाला. भाजपच्या सभापतीपदाच्या उमेदवाराची अंबादास दानवे यांनी कॉलर पकडल्यामुळे वातावरण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT