Vikhroli car driver beaten video Saam TV
Video

Shocking Video : कारला धक्का लागल्याने तरुण संतापला; ओला चालकाला रोडवरच आपटलं, धक्कादायक VIDEO

Vikhroli car driver beaten video : मुंबईच्या विक्रोळी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका खासगी कारचालकाने ओला कारचालकाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर त्याला उचलून जमिनीवरही आपटलं.

Satish Daud

मुंबईच्या विक्रोळी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका खासगी कारचालकाने ओला कारचालकाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर त्याला उचलून जमिनीवरही आपटलं. या घटनेत ओलाचालक बेशुद्ध होऊन पडला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झालाय.

याप्रकरणी पोलिसांनी खासगी कारचालक आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ऋषभ चक्रवती आणि त्यांची पत्नी अंतरा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषभ याने सुसाट वेगाने कार चालवत ओला चालकाच्या गाडीला धडक दिली.

त्यानंतर त्या ओला चालकाने भरपाई घेण्यासाठी त्या खासगी कार चालकाचा पाठलाग केला, त्यावेळी ओला चालकाचा गाडीचा आरोपी ऋषभ याच्या कारला धक्का लागला. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपीने ओला चालकाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्याला उचलून रोडवर आपटलं. सीसीटीव्ही वायरल झाल्याने ओला चालकाचा शोध घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT