PM Narendra Modi speech after Ravana Dahan on Dussehra 
Video

PM Modi : देशाचे ३ मोठे शत्रू कोणते? रावण दहनानंतर पंतप्रधान मोदींचे देशावासियांना मोठे आवाहन

विजयादशमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा देत प्रभू श्रीरामांचे आदर्श, सत्याचा विजय आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. रावण दहनानंतर मोदींनी देशाच्या एकतेबाबत काय संदेश दिला? जाणून घ्या सविस्तर.

Namdeo Kumbhar

PM Narendra Modi speech after Ravana Dahan on Dussehra : दशहरा आणि विजयादशमीच्या पवित्र पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना एक अत्यंत मोठं विधान केले. रावण दहनानंतर बोलताना पीएम मोदींनी देशासमोर उभे ठाकलेले ३ सर्वात मोठे शत्रू कोणते, याचा जाहीर उच्चार केला आहे. देशाच्या एकता, मान-सम्मान आणि संस्कृतीला आतून पोखरणाऱ्या या तीन शत्रूंचा खात्मा करण्यासाठी आता संपूर्ण देशाला एकत्र येऊन लढा द्यावा लागेल, असा पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना सावध केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आज देशाचा कोना-कोना राममय झाला आहे. गाव आणि शहरांमध्ये रामलीलांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, रामलीलांचे मंचन ही प्रभू श्री राम यांचा आदर्श जिवंत ठेवण्याची परंपरा आहे. हा सण म्हणजे अत्याचार आणि आतंक संपवण्याचा उद्घोष तसेच असत्यावर सत्याच्या विजयाचा विश्वास आहे. हा आपल्यासाठी केवळ एक सण नसून भारताची प्राण ऊर्जा आहे. ते म्हणाले की, या देशाने आणि संस्कृतीने हजारो वर्षांपासून प्रभू श्रीरामांची उपासना केली आहे. ही श्रद्धा केवळ त्यांनी रावणाचा वध केला म्हणून नाही, तर त्यांनी मानवी इतिहासात अतुलनीय असे आदर्श निर्माण केले आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Dasara Melava live: कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही; उद्धव ठाकरेंचा हुंकार

Dussehra Horoscope : दसऱ्यानंतर ३ राशींचे नशीब चमकणार! धनलाभासह रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत

Shivsena Dasara Melava : अमित शाह हेच खरे लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊतांचा थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: जरांगे आमच्या दोन पक्षांमध्ये मतभेद तयार करत आहेत: गिरीश महाजन

Home Remedies : काळवंडलेली पूजेची भांडी चकाकण्यासाठी घरातच बनवा नैसर्गिक पितांबरी

SCROLL FOR NEXT