PM Narendra Modi SaamTv
Video

PM Narendra Modi : मनमोहन सिंग हे प्रामाणिकपणा आणि साधेपणाचे प्रतिबिंब, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

Dr. Manmohan Singh Passes Away : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Saam Tv

डॉ. मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय विश्वाबरोबरच इतर क्षेत्रातून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. मनमोहन सिंग यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

यावेळी त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलताना म्हंटलं की, मनमोहन सिंग यांनी आर्थिक संकटाने घेरलेल्या देशात नव्या अर्थव्यवस्थेचा मार्ग मोकळा केला. डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि साधेपणाचे प्रतिबिंब होते. जनतेशी आणि देशाच्या विकासाची त्यांची बांधिलकी भविष्यात नेहमीच आदराने पाहिली जाईल. देशवासीयांच्यावतीने मी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी पक्षीय राजकारणाच्या वर उठून प्रत्येक पक्षातील लोकांशी संपर्क ठेवला. इथे दिल्लीत आल्यानंतरही मी त्यांना भेटायचो, बोलायचो. या कठीण काळात मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. मी सर्व देशवासियांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची नम्रता आणि सौम्यता हे त्यांच्या संसदीय जीवनाचे वैशिष्ट्य ठरले, असं मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

Rice cooking methods: पातेलं की कुकर? कशात शिजवलेला भात तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर?

SCROLL FOR NEXT