PM Modi News SaamTv
Video

PM Narendra Modi : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की; पंतप्रधान मोदींचा खासदार सारंगींना फोन | VIDEO

Clashes In Parliament : गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधीपक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. संसदभवनाबाहेर झालेल्या धक्काबुक्कीनंतर पंतप्रधान मोदी यांनी खासदार सारंगी यांना फोन केला आहे.

Saam Tv

संसदभवना बाहेरची परिस्थिती एकंदरीतच गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर चिघळलेली बघायला मिळत आहे. संसद भवनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आलेले असतानाच याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सारंगी यांना फोन केला आहे. फोनवरून पंतप्रधान मोदी यांनी सारंगी यांच्या प्रकृतीची चौकशी केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी आज राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान अमित शाह यांनी केला असल्याचं म्हणत आज विरोधी पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. संसद भवनाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाच्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याने दुखपत झाल्याचा आरोप सारंगी यांनी केला. त्यांनंतर आता पंतप्रधान मोदी यांनी याच खासदार सारंगी यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचं समजत आहे. झालेल्या सर्व प्रकारची माहिती देखील यावेळी मोदींनी सारंगी यांच्याकडून घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT