Pm Narendra Modi FICCI Event News  AI Image
Video

PM Narendra Modi : शेतीमध्ये गुंतवणूक करा, पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

PM Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्कीच्या शताब्दी महोत्सवात नागरिकांना शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. जागतिक कृषी निर्यातीत भारताचा वाटा केवळ २ टक्के असून तरुण आणि उद्योजकांनी कृषी क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

Alisha Khedekar

दिल्लीतील फिक्कीच्या शताब्दी महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि शेती क्षेत्रातील संधींबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना शेतीकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले. भारत हा जगातील मोठा देश असूनही जागतिक कृषी निर्यातीमध्ये भारताचा वाटा केवळ २ टक्के आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे मोदी यांनी सांगितले. देशातील अनेक तरुण आणि व्यावसायिक नोकरी तसेच कॉर्पोरेट क्षेत्राकडे जाण्यास प्राधान्य देतात. मात्र, शेती क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. हे चित्र बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काही वर्षांत शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे तरुणांनी आणि उद्योजकांनी शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता एक मोठी संधी म्हणून पाहावे, असे आवाहन मोदी यांनी केले. तसेच, देशात अशा वस्तू आणि उत्पादने तयार केली पाहिजेत, ज्यांना परदेशात मोठी मागणी आहे. भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत वेगळी ओळख मिळाली पाहिजे. आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून भारताची स्वतंत्र ओळख निर्माण झाली पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Largest Relegion: 2035 पर्यंत इस्लाम ठरू शकतो जगातील सर्वात मोठा धर्म; अमेरिकी थिंक टँकचा अंदाज

Nashik Picnic : थंडीच्या दिवसांत कुटुंबासोबत फिरण्यासाठी नाशिकमधील ५ सुंदर ठिकाणे, कमी बजेटमध्ये प्लान होईल ट्रिप

Maharashtra : शिंदेसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी फाडला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो; ठाकरेसेना संतप्त

Maharashtra News Live Update: पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका; सलग तिसऱ्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील अतिक्रमण हटवलं

Dadar Railway Station: दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यासाठी आतापर्यंत किती वेळा प्रयत्न झाले? 1956 पासूनचा संपूर्ण इतिहास वाचा!

SCROLL FOR NEXT