PM Modi Talk With Shubhanshu Shukla Saam Tv
Video

Shubhanshu Shukla: अंतराळातून भारत खरा कसा दिसतो? कॅप्टन शुभांशु शुक्लांनी PM मोदींना सांगितला स्पेस यात्रेचा अनुभव

PM Modi Talk With Shubhanshu Shukla: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळात गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी शुभांशूचे अभिनंदन केले.

Bharat Jadhav

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाऊल ठेवून एक नवा इतिहास रचलाय. अंतराळाची यात्रा करणारे दुसरे भारतीय नाही तर अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय देखील बनले आहेत. या अभिमानास्पद क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळात असलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याशी खास संवाद साधला. यादरम्यान दोघांमध्ये अनेक विषयांवर संवाद झाला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शुभांशूला विचारले की, अंतराळाची विशालता पाहिल्यानंतर पहिला विचार कोणता होता? यावर उत्तर देताना ग्रुप कॅप्टन म्हणाले की जेव्हा आम्ही पहिल्यांदाच कक्षेत पोहोचलो तेव्हा पहिला व्ह्यू पृथ्वीचा होता. या काळात माझ्या मनात पहिला विचार आला की संपूर्ण पृथ्वी एकसारखी दिसते. कोणतीही सीमा दिसत नाही. दुसरी गोष्ट जी मला लक्षात आली ती म्हणजे जेव्हा मी अंतराळातून भारत पाहिला तेव्हा मला जाणवले की, आपला देश नकाशावर आपल्याला दिसतो तितका मोठा नाही. पण भारत खरोखरच खूप भव्य आणि मोठा दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT