Pimpri Chinchwad municipal negligence PMAY project Saam Tv
Video

पीएम आवास योजनेच्या इमारतीचं गेट कोसळलं अन्... निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ|VIDEO

PM Awas Yojana Gate Collapse Incident: पिंपरी चिंचवडमधील चऱ्होली येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतीचा दीड टनाचा गेट कोसळून नागरिक जखमी झाला. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

पिंपरी चिंचवड़ शहरातील चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजनेच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे साधारण दीड टनाचे लोखंडी गेट निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्थानिक नागरिकाच्या अंगावर पडले त्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चऱ्होलीच्या आवास योजनेत प्रचंड समस्या असून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम याठिकाणी झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. यातील ९०% लाभार्थ्यांना लिकेजचा त्रास सहन करावा लागत असून छोटे मोठे बरेच प्रश्न याठिकाणी वारंवार सांगूनही सुटत नसल्याची स्थानिक नागरिकांची भावना आहे.

अशातच काल दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी साडे आठ वाजता ही घटना घडली. या घटनेत स्थानिक नागरिक राहुल जाधव यांच्या अंगावर हे दीड टनाचे लोखंडी गेट पडले. मात्र सुदैवाने गेट पडल्यावर ते पुढे फेकले गेले त्या गेटखाली सापडले असते तर मोठी जीवितहानी झाली असती सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. तरी या घटनेविरुद्ध येथील निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असून महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहेत. असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sankranti Special Food : मकर संक्रांतीसाठी बनवा पारंपरिक आणि स्वादिष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी, पाहा पदार्थांची यादी

Film Crew Hostage: धक्कादायक! बिग बॉस फेम अभिनेत्रीसह ५० क्रू मेंबर्सला बनवलं बंदी, नेमकं झालं काय होतं?

Maharashtra Live News Update: भाजपकडून डावलल्याने रूपाली चौधरी थेट अपक्ष रिंगणात

New Expressway: मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक द्रुतगती मार्ग, नागपूर ते चंद्रपूर प्रवास होणार फक्त २ तासांचा

Masala Karli Recipe: कडू न लागणारी मसाला कारली कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT