Neral News SaamTv
Video

Neral News : नेरळमध्ये गुंडाराज? व्हिडिओ आला समोर

News Update :कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये वाहनचालकाला जबर मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे नेरळमध्ये गुंडागर्दी वाढली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Saam Tv

भर रस्त्यात एका वाहनचालकाला जबर मारहाण झाल्याची घटना नेरळमध्ये घडली आहे. त्यामुळे नेरळमध्ये गुंडागर्दी वाढली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये वाहनचालकाला जबर मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत मारहाण करणारा व्यक्ती हा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या गुंडागर्दीकडे पोलिसांचं दुर्लक्ष आहे का? असा प्रश्न देखील या व्हिडिओमुळे उपस्थित होत आहे.

या घटनेवर उद्धव ठाकरे यांनी, ''राज्यात गुंडाराज. मिंधेंच्या आमदार महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक शिवा याने नेरळमध्ये भररस्त्यात एका इसमाला मारहाण केली. यावेळी कोणीही मध्ये पडले नाही. कायद्याच्या चिंधड्या झाल्या अन लोकांचे हाल झाले.'' असे ट्विट केले आहे. तर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या घटनेबद्दल माहिती देताना ''हे दोन्ही व्यक्ती माझ्या महितीतले आहे. त्यांच्यातला वाद हा वैयक्तिक होता. त्याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. मात्र यातला व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. '' असे स्पष्टीकरण दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT