Devendra Fadanvis News SaamTV
Video

Devendra Fadnavis News : 'फेक नरेटिव्ह संपलाय लोकं भाजपसोबत'- देवेंद्र फडणवीस | Marathi News

Maharashtra Politics : "हम साथ साथ है'' म्हणणारे आता ''हम तुम्हारे है कौन?" असं म्हणायला लागले आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Saam Tv

"हम साथ साथ है'' म्हणणारे आता ''हम तुम्हारे है कौन?" असं म्हणायला लागले आहेत असं पाहायला मिळत आहे. फेक नरेटीव संपलेला आहे, हे हरियाणाच्या निवडणुकीतून दिसून आलं. लोक आता भाजपच्या पाठीशी आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. हरियाणातील विजयावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजप हरियाणा हरेल आणि त्यांच्यावर आम्ही हल्ला करू अशा तयारीत शरद पवार, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस बसले होते. पण देशाचा मूड आता त्यांच्याही लक्षात आलेला असेल, असा टोला देखील त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. यावेळी जागा वाटपवर बोलताना फडणवीस यांनी 'जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं म्हंटल आहे.

वित्तमंत्री असताना आठ नवीन मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यातील पाच हे विदर्भातील आहे. यात पाच कॉलेजची सुरुवात होत आहे. यात गडचिरोली, भंडारा, वाशिम, बुलढाणा, वर्धामध्ये हे कॉलेज सुरू होत असून यामुळे महाराष्ट्राच्या मेडिकल सीटमध्ये मोठी वाढ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. शिर्डी विमानतळाविषयी बोलताना फडणवीस यांनी आज स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याचं म्हंटलं आहे. देशातील आधुनिक विमानतळ तयार होत आहे. शिर्डीला आता सुंदर एअरपोर्ट मिळणार असून कार्गो प्रवाशांची सोय, नागपूर आणि महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारं एअरपोर्ट ठरणार असल्यांचं देखील त्यांनी म्हंटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT