Parth Pawar arrives at Modi Baug in Pune to meet Sharad Pawar and Supriya Sule amid major political developments. Saam TV Marathi
Video

Parth Pawar : मोठी बातमी! पार्थ पवार अचानक शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या भेटीला, नेमकी चर्चा काय ?

NCP developments ahead of Sunetra Pawar oath ceremony : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीआधी राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. पत्रकार परिषदेनंतर लगेचच पार्थ पवार यांनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली, ज्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Parth Pawar meets Sharad Pawar at Modi Baug Pune : शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार पुण्यातील मोदी बागेत पोहचले आहेत. सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधीच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी या निर्णायाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे ठामपणे सांगितले होते. या पत्रकार परिषदेनंतर लगेच पार्थ पवार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील मोदी बागेत पोहचले आहेत. पार्थ पवार-शरद पवार यांच्यामध्ये आता नेमकी काय चर्चा होतेय? याकडे राज्याचे लक्ष लागलेय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्याआधी राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामधेही भेट झाली आहे. एकीकडे पार्थ पवार हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीही भेट होत आहे. तटकरे आणि पटेल यांनीही सुनेत्रा पवार यांची एकत्र भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजितदादा माझ्या घरी आलेले, विलिनीकरणावर जयंत पाटील यांचं मोठं विधान

Office Wear Saree: ऑफिस लूकसाठी या 5 साड्या बेस्ट, तुमचा प्रोफेशनल लूक दिसेल भारी

Sunetra pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासोबत कोणती खाती मिळणार? महत्त्वाची माहिती आली समोर

Comedy Actor Death News : ज्येष्ठ विनोदी अभिनेत्रीचं ७१ व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Gold Rate Today: अर्थसंकल्पाआधी सोनं स्वस्त! १० तोळ्यामागे ₹८६,२०० ची घट, वाचा 22k, 24k गोल्डची प्रति तोळा किंमत

SCROLL FOR NEXT