Walmik Karad Mother SaamTv
Video

Walmik Karad : माझ्या लेकरावर खोटे गुन्हे; कराडच्या आईचं पोलीस ठाण्यात ठिय्या | Video

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्यावर दाखल केलेले सगळे गुन्हे खोटे असून त्याला न्याय मिळवा अशी मागणी कराड याच्या आईने केली आहे.

Saam Tv

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. याअनुषंगाने आवादा कंपनीच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत कराड याच्या आईने केली आहे. यासाठी त्यांनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील सुरू केलं आहे.

बीडच्या केजमधील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याने पोलिसांना सरेंडर केलेलं आहे. त्यानंतर पोलिसांकडून या तपासाला वेग आलेला आहे. सध्या दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात कराड हा पोलीस कोठडीत आहे. मात्र हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या व माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मिक कराड याची आई पारुबाई बाबुराव कराड (७५) यांनी आज सकाळपासून परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT