Pankaja Munde on Maharashtra Drought: 
Video

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी जनतेला कोणतं वचन दिलं? दुष्काळावर काय म्हणाल्या?

Pankaja Munde on Maharashtra Drought: यंदाचा दुष्काळ अत्यंत गंभीर असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मागील दुष्काळाप्रमाणे यंदाही या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Bharat Jadhav

राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका शेतकरी आणि ग्रामीण भागाला बसत आहे. या पार्श्वभूमीवर सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे दुष्काळाच्या परिस्थितीवर भाष्य केलं ‘माझ्या लोकांसाठी पाऊस पाड बाबा’, अशी प्रार्थना भगवान बाबांकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मागच्यावेळी ज्याप्रमाणे दुष्काळात शेतकऱ्यांना साथ दिली, त्याचप्रमाणे यावेळी साथ देईन, असं वचन पंकजा मुंडे यांनी दिलं. त्याचवेळी त्यांनी जातीचं राजकारण करणाऱ्यांना टोला देखील लगावला. दुष्काळाच्या मुद्द्यावरून बोलताना पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला. यावर्षाचा दुष्काळ खूप भयानक आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण मागील दुष्काळ हा हाताळला त्याप्रमाणे यावेळीही दुष्काळ हाताळू. मागील काळात शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटवला. जनावऱ्यांसाठी छावण्या लावल्या. पीक विमा मिळाला. त्याच प्रमाणे आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहवू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत

Ilkal Saree Designs For Women: इल्कल साड्यांचे लेटेस्ट न्यू कलेक्शन, हे 5 पॅटर्न्स नक्की आवडतील

रोज न चुकता आवळ्याचा रस प्या, केस होतील लांबच लांब

Snoring : झोपेत का घोरतात? काय आहेत कारणे, ती किती गंभीर?

Car Dashboard : कारच्या डॅशबोर्डवर लागणाऱ्या पिवळ्या लाईटचा अर्थ काय असतो?

SCROLL FOR NEXT