Viral Video Panipuri Stall Saam Tv
Video

Panipuri Viral Video: पाणीपुरीत जिवंत उंदीर; व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO

Viral Video Panipuri Stall: पाणीपुरी खायला गेलेल्या फूड ब्लॉगरला गोड पाण्यात जिवंत उंदीर आढळला. पंजाबच्या फिरोजपूर येथील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Panipuri Viral Video: तुम्हालाही पाणीपुरी खायला आवडते का? मग ही बातमी नक्की वाचा. पाणीपुरीप्रेमींना धक्का देणारी घटना समोर आली असून, पाणीपुरी खायला गेलेल्या एका फूड ब्लॉगरला पाणीपुरीच्या गोड पाण्यात चक्क जिवंत उंदीर आढळून आला. हा प्रकार पंजाबमधील फिरोजपूर येथे घडला असून, संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फूड ब्लॉगरने रस्त्यावरील एका पाणीपुरीच्या गाडीवर व्हिडीओ शूट करत असताना गोड पाण्याच्या भांड्यात हालचाल दिसली. नीट पाहिल्यानंतर त्या भांड्यात जिवंत उंदीर असल्याचे स्पष्ट झाले. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर ब्लॉगरने तत्काळ व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अनेकांनी अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून संबंधित पाणीपुरी विक्रेत्याची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT