Pandharpur Vitthal Temple Plans Dress Code for Foreign Devotees 
Video

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांसाठी नवा नियम;वस्त्रसंहितेची एसओपी तयार होणार

Pandharpur Vitthal Temple Dress Code : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांसाठी वस्त्रसंहितेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेनुसार पोशाखाबाबत मंदिर प्रशासनाकडून एसओपी तयार करण्याचे काम सुरू आहे.

Bharat Jadhav

कोट्यवधी वारकरी आणि वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या परदेशी भक्तांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेनुसार पोशाख परिधान करणाऱ्या परदेशी भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी थेट प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून एसओपी अर्थात प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर परदेशातूनही अनेक विठ्ठलभक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. या परदेशी भक्तांनी विठ्ठल दर्शनावेळी भारतीय आणि वारकरी परंपरेला साजेसा पोशाख परिधान करावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळींच्या सल्लागार परिषदेने ठराव करून मंदिर समितीकडे पाठवला आहे. या ठरावाच्या अनुषंगाने वस्त्रसंहितेची नियमावली आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update:कडाक्याच्या थंडीआधी हवामानाचा यू-टर्न! १६ राज्यांत पावसाचा अंदाज; कुठे पाऊस, तर कुठे ताशी ६० किमी वेगाने वारे!

दोन्ही राष्ट्रवादीत विलिनीकरणावर खलबतं? सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोनाफोनी?

Maharashtra News Live Update: महाबळेश्वर आणि तापोळा परिसराचा होणार कायापालट

साम टीव्हीचा दणका अन् तहसीलदाराला जाग; बदलापूर नगरपरिषदेला 'कारणे दाखवा' नोटीस

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खासगी सचिवाकडून महिला तालुका प्रमुखाला मारहाण; शिवसेनेत खळबळ

SCROLL FOR NEXT