Pandharpur Vitthal Temple AI
Video

दुष्काळात भक्तांच्या मदतीला धावला 'विठू माऊली'! मंदिर समितीचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार 'एवढा' निधी

Pandharpur Vitthal Temple: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीला २ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, १४ नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रेनिमित्त २४ तास दर्शन सुरू होणार आहे.

Namdeo Kumbhar

गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे दैवत असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी दुष्काळाच्या भीषण टंचाईच्या काळात आपल्या भक्तांच्या मदतीला धावून आले आहे. दुष्काळ निवारणासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने 'मुख्यमंत्री सहायता निधी'स तब्बल २ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या मदतीचा धनादेश लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

काल पार पडलेल्या मंदिर समितीच्या बैठकीत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कार्तिकी यात्रेला २४ तास दर्शन सुरूणार

या वेळी बोलताना गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठल भक्तांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. आगामी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येत्या १४ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू केले जाणार आहे. यामुळे कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?

Maharashtra News Live Update: पाण्याअभावी सात वर्षांची मोसंबी बाग वाळली; शेतकरी महिलांच्या डोळ्यांत अश्रू

Banana vs dates: केळी की खजूर...काय खाणं आरोग्यासाठी बेस्ट, शरीरात काय बदल होतात?

Mumbai News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! विद्याविहार उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, १० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

Raj Thackeray : MPSC विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नोकऱ्यांसंदर्भात मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा

SCROLL FOR NEXT