Pandharpur Temple Closed  Saam TV
Video

Pandharpur : आषाढी वारीनंतर विठ्ठलाचे दार 24 तास बंद, विठूरायाचे राजोपचार सुरू | VIDEO

Vitthal Temple Pandharpur Closed : पंढरपूरमध्ये आषाढी वारीनंतर विठ्ठलाच्या २४ तास दर्शनाला आजपासून विश्रांती मिळाली आहे. २७ जूनपासून सुरू असलेले अखंड दर्शन आजपासून बंद करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूरमध्ये आषाढी वारीची जय्यत तयारी आणि लाखोंच्या संख्येने झालेल्या भक्तांच्या दर्शनानंतर आजपासून श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात देवाच्या दर्शनाला विश्रांती देण्यात आली आहे. २७ जूनपासून सुरू असलेलं २४ तास अखंड दर्शन आजपासून थांबवण्यात आलं असून, विठ्ठलाच्या पारंपरिक राजोपचारांना सुरुवात करण्यात आली आहे. वारीच्या काळात लाखो वारकऱ्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. त्या पार्श्वभूमीवर देवाला विश्रांती देण्याची परंपरा पाळली जाते.

आजपासून देवाला थकवा दूर करण्यासाठी विशेष आयुर्वेदिक उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याला आयुर्वेदिक काढा नैवेद्य म्हणून अर्पण केला जात असून, पूजा‑अर्चा राजशाही पद्धतीने केली जात आहे.या काळात मंदिरातील दैनंदिन पूजा सोहळ्यांमध्ये विशिष्ट बदल करण्यात येतात. तसेच काही काळाने नियमित दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? हे उपाय खुलवतील तुमचं हास्य

SCROLL FOR NEXT