21 lakh  saam tv
Video

Pandharpur News: साफसफाई काम करणाऱ्या महिलेला तब्बल 21 लाखांची लागली लॉटरी|VIDEO

From Toilet Cleaner to Lottery Winner: पंढरपूर येथील एका साफसफाई काम करणाऱ्या महिलेला 21 लाखांची लॉटरी लागली आहे. पांडुरंग पावला अशी भावना त्या महिलेने व्यक्त केली आहे.

Omkar Sonawane

पिढ्यानपिढ्या स्वच्छतेच काम करणाऱ्या पंढरपुरातील मेहतर समाजातील एका गरीब महिलेला तब्बल 21 लाख रुपयांची लॅाटरी लागली आहे. साक्षात पांडुरंग पावला अशी भावना मनिषा वाघेला या लॉटरी विजेत्या महिलेने व्यक्त केली आहे.

स्वच्छतेची कामे करणारा मेहतर समाज पंढरपुरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या समाजातील महिला व पुरुष पंढरपूर शहरात स्वच्छतेची काम करतात. मनीषा वाघेला यादेखील शहरातील अनेक लोकांकडे शौचालयांच्या स्वच्छतेच काम करून आपला उदरनिर्वाह करतात.

मनीषा वाघेला यांचे पंढरपुरात मेहतर गल्लीमध्ये दहा बाय दहा चे पत्र्याचे घर आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने त्या स्वच्छतेची काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अलीकडेच त्या पंढरपुरातील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या‌. यावेळी त्यांनी सहज म्हणून शेजारी असलेल्या लॉटरी केंद्रातून पन्नास रुपयांना 21 लाख रुपये किंमतीचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.

त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांना 21 लाख रुपयांची लॉटरी लागली. लॉटरीचे लागल्याचे कळताच पांडुरंग पावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या पैशातून एक छोटेसे घर खरेदी करणार आणि मुलांना चांगले शिक्षण देणार असल्याचे मनीषा वाघेला यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT