Ladki Bahini Yojana Pandharpur Video Saam TV
Video

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी महिलांची मोठी झुंबड; तलाठी कार्यालयात ढकलाढकली, पाहा VIDEO

Ladki Bahini Yojana Pandharpur Video : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आतुर झाल्या आहेत. पंढरपूर येथील तलाठी कार्यालयात आज सकाळपासूनच अर्ज घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली.

Satish Daud

पंढरपूर : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आतुर झाल्या आहेत. पंढरपूर येथील तलाठी कार्यालयात आज सकाळपासूनच अर्ज घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली.

तलाठी कार्यालयात उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या. अर्ज मिळवण्यासाठी महिलांनी एकमेकींना ढकलाढकलही केली. अचानक गर्दी वाढल्याने तलाठ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. त्यांनी तातडीने कार्यालयाचे कामकाज बंद केले आहे.

त्यामुळे अर्ज घेण्यासाठी महिला ताटकळत उभ्या आहेत. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करणाऱ्या सरकारला जाग येईल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

Maharashtra Politics: शिंदेसेनेचा नगराध्यक्ष भाजपनं पळवला, दिल्लीवारीनंतरही शिंदेंची कोंडी सुरुच

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

SCROLL FOR NEXT