Dhangar Community Hunger Strike Saam tv
Video

Dhangar Community Hunger Strike : धनगर आंदोलक आक्रमक; उपोषणस्थळी विष पिऊन केला आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, VIDEO

Dhangar Community Hunger Strike update : धनगर उपोषणासाठी धनगर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उपोषणस्थळी एका आंदोलकाने विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

Vishal Gangurde

पंढरपूर : धनगर समाजाच्या आंदोलकांनी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनगर समाजाच्या आंदोलकांनी पंढरपूरमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. पंढरपूरमधील उपोषणस्थळी आंदोलक संजय चौगुले यांनी उपोषण ठिकाणी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी अमोल देवकाते यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका आंदोलकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

धनगर आरक्षण आंदोलक अमोल देवकाते यांनी विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज संजय चौगुले यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. चौगुले यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंढरपूरमध्ये राज्यव्यापी आमरण उपोषण आठवा दिवस असताना ईश्वर वाटर येथील संजय चौगुले यांनी उपोषण ठिकाणी विष प्राशन केले. संजय चौगुले यांनी विष प्यायल्यानंतर उपोषणस्थळी एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

Nagpur : नागपूर हादरलं! दिवसाढवळ्या पोलिसाची निर्घृण हत्या, तिघांनी धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT