Pandharpur Saam TV
Video

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई, प्रकाशमय वातावरणात भाविकांच्या आनंदाला उधाण | VIDEO

Vitthal Rukmini Temple : आषाढी यात्रेच्या सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे. मंदिर परिसर दिव्यांनी सजला असून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी एकादशीच्या पाश्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तीमय वातावरणात न्हालेली आहे. विशेषतः विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिर परिसर दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघाला असून, सर्वत्र भक्तिरसाचं वातावरण निर्माण झालं आहे.वारीच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत दिव्यांनी सजवण्यात आला आहे.

रंगीबेरंगी एलईडी लाइट्स, झगमगणाऱ्या कमानी आणि विविध धार्मिक आकृतींनी सजवलेली रचना, यामुळे संध्याकाळी मंदिर परिसर एक वेगळाच देखावा साकारतो आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. या झगमगत्या वातावरणात वारी आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उजळलेले हे प्रकाशमय दृश्य भाविकांच्या मनात एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT