Pandharpur Firing: Shiva Organization President Rajabhau Bhinge Shot saam tv
Video

पंढरपूर हादरलं! शिवा संघटनेच्या अध्यक्षावर अज्ञातांकडून गोळीबार

Pandharpur Shooting : पंढरपूरमध्ये शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांच्यावर इसबावी येथील राहत्या घराजवळ गोळीबार झालाय. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरूय.

Bharat Jadhav

पंढरपूरमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. इसबावी येथील त्यांच्या राहत्या घराजवळ हा गोळीबार करण्यात आला. या घटनेत राजाभाऊ भिंगे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना उपचारासाठी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल, कोणाची कुठे झाली पोस्टिंग?

Wednesday horoscope: नोकरी बदलण्याचा विचार करताय? 'या' राशींसाठी आजचा दिवस घेऊन येणार नवीन संधी

Fact Check: आकाशात दिसले महादेव? व्हिडिओमागचं सत्य काय?

सोनं खरेदी करताय सावधान! हॉलमार्क सोनंही बोगस असू शकतं

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हास्यकलाकाराचं निधन; नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा

SCROLL FOR NEXT