Palghar News SaamTv
Video

Palghar News : सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिंदेंच्या आमदारांचं पहिलं सीसीटीव्ही फुटेज | Video

Shiv Sena Shinde Group : शिवसेनेचे माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुकाध्यक्ष अशोक धोडी हे गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आता पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज देखील सापडलं आहे.

Saam Tv

शिवसेना शिंदे गटाच्या डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात आता पोलीस चौकशीला वेग आला आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले असून या सीसीटीव्हीच्या आधारे धोडी यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

शिवसेनेचे माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुकाध्यक्ष अशोक धोडी यांचे अपहरण झाल्याचे सांगण्यात येत असून डहाणू येथून त्यांच्या खाजगी ब्रिजा कारने घरी परतत असताना २० तारखेच्या सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांचा भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. झाई बोरीगाव मार्गावरील हा व्हिडिओ असून ब्रिजा कारच्या पुढे एक इको गाडी जाताना दिसते. त्यामागे लाल कलरची ब्रिजा भरधाव वेगात जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. ज्या ठिकाणचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे त्यापासून एक किलोमीटरच्या अंतरावरून अशोक धोडी यांचे झाई बोरीगाव घाट रस्त्यावर गाडी आडव्या लावून त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे. अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांना काही संशयीतांची नावं देखील देण्यात आली असून मोबाईल आणि या संशयीतांच्या मागावर सध्या पोलीस असल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितल आहे. तर धोडी अपहरण प्रकरणात पोलिसांनी तपासाचा वेग आणखी वाढवावा अशी मागणी पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT