bharat pakistan saam tv
Video

Pahalgam Terrorist Attack: पाकिस्तानचा युद्धाभ्यास सुरू, बॉर्डरवर हालचालींना वेग|VIDEO

Pakistan military on alert: भारताचे नंदनवन असलेले काश्मीर येथे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये 26 निर्दोष लोक हे मृत्युमुखी पडले.

Omkar Sonawane

दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत दहशतवाद्यांचा खात्मा करू असा कठोर इशारा दिल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. आज भारतीय लष्कराने दोन स्थानिक दहशतवाद्यांचे घर उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानची पायाखालची वाळू सरकली असून पाकिस्तान लष्कराने आता युद्धाभ्यास सुरू केला असून अर्लट झाल्याचे दिसून येत आहे

तसेच राजस्थानला लागून असलेल्या पाकिस्तान बॉर्डरवर देखील BSF जवान तैनात करण्यात आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा राज्यातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक घेत होते. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सुरक्षेच्या स्तराची सखोल समीक्षा करण्यात आली. या बैठकीस मुख्य सचिव, पोलिस महासंचालक (DGP) यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतली, ज्यामध्ये सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) आणि पोलिस अधीक्षक (SP) यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून विशेष नजर ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT