PM Modi cancels Russia Visit saam tv
Video

PM Modi : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढला, PM मोदींचा रशिया दौरा रद्द

PM Modi cancels Russia visit : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद विकोपाला गेलेला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया दौरा रद्द केला आहे.

Nandkumar Joshi

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा दाट संशय आहे. या संशयाला बळकटी देणारे अनेक व्हिडिओ पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवी दिल्लीत सरकारच्या उच्च पातळीवर बैठका सुरू आहेत. दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भारत-पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये तणाव कमालीचा वाढलेला दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजित रशिया दौरा रद्द केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया दौरा रद्द केला आहे. भारत-पाकिस्तानच्या तणावामुळे हा दौरा रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार नाहीत. पेस्कोव यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय भारताकडून घेण्यात आला आहे आणि याबाबतची माहिती यापूर्वीच रशियन प्रशासनाला देण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींचं रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी न होणे हे अनेक दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT