Uddhav Thackeray saam tv
Video

Pahalgam Attack : भारत पाकविरोधात आक्रमक, उद्धव ठाकरेंकडून PM मोदींचं कौतुक, VIDEO

Uddhav Thackeray Praises PM Modi : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या भूमिकेवरून ठाकरे गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. दुसरीकडं, सरकारला सवाल करणाऱ्या विरोधकांनाही सुनावलं आहे.

Omkar Sonawane

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. दहशतवादी आणि दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतानं कठोर कारवायांना सुरुवात केली आहे. भारताच्या याच आक्रमक भूमिकेला ठाकरे गटानं पाठिंबा दिला आहे. सरकारने घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून ठाकरे गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.

ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. पण राजकीय विरोधक असलेल्या ठाकरे गटानं यावरून विरोधकांनाच सुनावलं आहे. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून काय साध्य होणार आहे, असा सवाल त्यांनी अग्रलेखातून उपस्थित केला आहे. पाकिस्तानला धडा शिकवणार का? असा प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये, असा सल्लाही ठाकरे गटानं अग्रलेखातून दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

Maharashtra News Live Update : पवना बंद जलवाहिनीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

Pitru Paksha 2026: घरात अकाली मृत्यू झाला असेल, तर पितृपक्षात नक्की करा हे ३ उपाय; दिवंगत आत्म्याला मिळेल मोक्ष!

Mumbai : मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट, पश्चिम रेल्वेची कारवाई; पाहा Video

SCROLL FOR NEXT