Teachers Salary Hike SaamTv
Video

Education Department : ५० हजारांहून अधिक शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत | Video

Teachers Waiting For Salary Hike : आर्थिक वर्ष संपायला २ महिनेच शिल्लक असतानाच ५० हजारांहून अधिक शिक्षक पगार वाढीच्या प्रतीक्षेत असल्याचं बघायला मिळत आहे.

Saam Tv

राज्यात ५० हजारांहून अधिक शिक्षक पगार वाढीच्या प्रतीक्षेत असल्याचं बघायला मिळत आहे. आर्थिक वर्ष संपायला २ महिनेच शिल्लक आहेत. मात्र तरीही या शिक्षकांची पगारवाढ झालेली नाही. वाढीव टप्पा अनुदान रखडलेलं आहे. चालू आर्थिक वर्षाचं तब्बल ११०० कोटी रुपयांचं अनुदान न मिळाल्याने ५० हजारांपेक्षा जास्त शिक्षक हे पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सेवक संच नसल्याने आणि सरकारच्या तिजोरीत खडखडात असल्याने शिक्षण खात्याने निधीसाठी प्रस्तावच पाठवलेला नाही, अशी धक्कादायक बाब आता समोर आली आहे.

वाढीव अनुदानास पात्र शाळा या ३ हजार ४२७ आहेत. तर टप्पा अनुदानाची प्रतिक्षा असलेल्या शाळा या १५ हजार ५७१ आहेत. पगारवाढीतील शिक्षक हे अंदाजे ५१ हजार आहेत. वाढीव टप्प्यासाठी अपेक्षित निधी ११०० कोटी रुपयांचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT