CET Exam  Saam
Video

CET Exam : संतापजनक! लाडक्या बहि‍णींना मनस्ताप; परीक्षेला जाताना मंगळसूत्र, दागिने काढण्याची सक्ती

CTET exam dress code and rules India : छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थींना मंगळसूत्र आणि दागिने काढण्यास सांगितल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Namdeo Kumbhar

CTET Exam, Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी (CTET) परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थ्यांना अत्यंत संतापजनक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी महिलांना त्यांचे मंगळसूत्र आणि नाकातील दागिने काढण्याची सक्ती करण्यात आली. धातूचे कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई असल्याचे कारण देत प्रशासनाने ही कडक पाऊले उचलली होती. मात्र, अनेक केंद्रांवर दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने महिलांची मोठी गैरसोय झाली. काही महिलांना आपले दागिने सोबत आलेल्या नातेवाईकांकडे सोपवावे लागले, तर ज्यांच्यासोबत कोणीही नव्हते त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कडक तपासणीच्या नावाखाली महिलांच्या भावनांचा विचार न केल्याने प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सक्तीमुळे परीक्षा केंद्राबाहेर तणावाचे आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे महिला परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या नावाखाली होणारी ही अडवणूक चुकीची असल्याची भावना व्यक्त होत आहे.

राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटीची परीक्षा आहे. या परीक्षेला जाताना परीक्षार्थीना वेगळीच परीक्षा द्यावी आहे. परीक्षा केंद्रात आत जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून जावे लागले आहे. आज सकाळी ९:३० ते १२ यावेळेत परीक्षा आहे. तत्पूर्वी सकाळी सात वाजता रिपोर्टिंग टाईम असताना प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात जाताना कसून चौकशी केली जात होती. यात कुठलेही मेटलच साहित्य सोबत घेऊन जाऊ नका असे गेटवरच सांगण्यात आले. महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, काना नाकातले दागिने काढण्याचे सूचना केल्या त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असं सांगितले. त्यामुळं मंगळसूत्रासह अंगावरची सगळी दागिने काढावे लागले. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. त्यामुळे अनेक महिलांची परीक्षा केंद्रा जाताना अडचण झाली. काहींच्या सोबत नातेवाईक होते त्यांनी नातेवाईकांना सोनं दिलं. मंगळसूत्र दिले, पण काहींची मोठी अडचण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT