Sharad Pawar News Saam Tv
Video

Sharad Pawar: 'माझा राजा असा नव्हता', हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार गटाचे कार्यकर्ते नाराज? इंदापूरात बॅनरबाजी

Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त करत अज्ञातांनी शरद पवार यांना उद्देशून इंदापूरमध्ये लावले बॅनर.

Saam Tv

इंदापुरातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता इंदापूरात बॅनरबाजी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. अज्ञातांकडून शहरात एक बॅनर लावण्यात आला आहे. ज्याद्वारे हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेवर भाष्य करत या बॅनरवर लिहिलं आहे की, आज पवार साहेबांनी इंदापूर तालुक्यात जो निर्णय घेतला. तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची झाली आहे. दोघांनाही जनता कंटाळले होती. माझा राजा असा नव्हता, अशा आशयाचे बॅनर लावून अज्ञातांकडून हर्षवर्धन पाटलांसमोर एक प्रकारचे आव्हानं निर्माण केलं आहे. दरम्यान, हा बॅनर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीच लावला असावा, अशी चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT