Uddhav Thackeray vs Eknath Shinde saam tv
Video

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

Omraje Nimbalkar, Aaditya Thackeray : ओमराजे निंबाळकर पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार का? आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मनधरणीचे प्रयत्न, गुप्त बैठका आणि शिवसेनेतील घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Namdeo Kumbhar

Will Omraje Nimbalkar return to Uddhav Thackeray Shiv Sena : ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात वरूण सरदेसाई यांनी निंबाळकर यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. त्यातच आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आता ओमराजे पुन्हा ठाकरेंकडे परतणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे ६ आमदार फोडल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यामध्येच ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. आता आदित्य ठाकरेंच्या सूचक वक्तव्यानंतर ओमराजे ठाकरेंकडे माघारी परतणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन खूप मोठे आहे. जे कोणी मोठ्या मनाने पक्षात पुन्हा परतू इच्छितात, त्यांचे स्वागत आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी "मी अजून कोणत्याही पक्षात गेलो नाही" असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, परवा झालेल्या बैठकीला ते आले होते आणि ते आम्हा सर्वांना दिसले आहे. जर कोणाला परत यायचे असेल, तर ते येऊ शकतात.

पळून गेलेल्या किंवा इतर कारणांमुळे पक्षापासून दूर गेलेल्या नेत्यांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, आम्ही पुन्हा थेट जनतेशी संवाद साधणार आहोत, कारण या लोकांना जनतेनेच निवडून दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT