Minister Chhagan Bhujbal turns aggressive during OBC leaders’ meeting with CM Fadnavis over Maratha quota issue. Saam Tv
Video

Chhagan Bhujbal: ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री छगन भुजबळ आक्रमक|VIDEO

Chhagan Bhujbal Aggressive Over Maratha Reservation: ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरील जीआरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणासंदर्भातील आरक्षणाचा जीआर सरकारने काढल्यानंतर राज्यात ओबीसी नेते आक्रमक झाले आहे. या जीआरला मंत्री छगन भुजबळ हे देखील सुरुवातीपासून विरोध दर्शवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाले होते. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात तुम्ही शासन निर्णय कसा काढला असा प्रश्न भुजबळांनी विचाराला. तसेच अनेक ठिकाणी खाडाखोड करून, नोंदी बदलून कुणबी प्रमाणपत्र काढली जात असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत अजित पवार, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळ यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत भुजबळ हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT