Laxman Hake protest at Pune mahatma phule wada  saam tv
Video

Maratha Reservation GR : मराठा आरक्षणासाठीचा जीआर हाकेंनी फाडला, पुण्यात मौन आंदोलन

OBC leader Laxman Hake protest at Pune against Maratha Reservation GR : सरकारनं मराठा आरक्षण जीआर काढला. पण यावरून आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. नागपूरनंतर आता पुण्यातही ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत.

Nandkumar Joshi

मराठा आरक्षणाचा शासन निर्णय काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेलं उपोषण सोडलं आहे. मात्र, या आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या शासन निर्णयाविरोधात ओबीसी आक्रमक झाले आहेत. ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके देखील नाराज आहेत.

पुण्याच्या महात्मा फुले वाड्यात त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी मौन आंदोलन सुरू केलं आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी हाके यांनी शासन निर्णय फाडला.

तत्पूर्वी, मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आणि काढलेल्या जीआरमुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या जीआरची ओबीसी बांधवांनी होळी करावी, असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलं आहे. तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारच्या निर्णयाचा विरोध करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra News Live Update: आळंदी येथे पीएमपीएमएलच्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

'पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका'; मोदीचं आवाहन, सराफा व्यापारी अडचणीत, VIDEO

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात वाढ, पगार किती वाढणार?

SCROLL FOR NEXT