गॅस टंचाईच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया Saam TV
Video

गॅस सिलिंडर तुटवड्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? VIDEO

lpg shortage panic reaction by maharashtra chief minister Devendra Fadnavis : इराण-इस्रायल युद्धामुळं देशभरात गॅस तुटवडा निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. नागरिकांनी गॅस वितरण एजन्सीच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. या 'गॅस' गोंधळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

संजय तुमराम, साम टीव्ही न्यूज

पश्चिम आशियात युद्ध पेटलंय. मात्र, भारतासह अनेक देशांत गॅस तुटवड्याचा भडका उडालाय. महाराष्ट्रातील शहरी, तसेच ग्रामीण भागासह देशभरात याची झळ पोहोचू लागली आहे. बहुतांश ठिकाणी गॅस वितरण एजन्सीबाहेर सिलिंडरसाठी, तसेच पेट्रोल, सीएनजी पंपांबाहेर रांगा लागलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी तर गॅस सिलिंडरवरून हाणामाऱ्याही झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील 'गॅस' गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा नाही. केंद्र सरकारनंही याबाबत स्पष्ट केलंय. जितकी घरगुती गॅस सिलिंडरची मागणी आहे, तितका पुरवठा करण्यात येत आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

नागरिकांनी घाबरण्याचे किंवा पॅनिक होण्याचे कोणतेही कारण नाही, असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. दुसरीकडं, पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध असून, कुठल्याही प्रकारची टंचाई नाही, असं केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. यावर केंद्रातील, तसेच राज्यातील विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. त्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय.

काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. लोकांनी गॅससाठी रांगा लावाव्यात असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक अफवा पसरवत असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा तुटवडा ! इलेक्ट्रॉनिक शेगड्यांची मागणी वाढली

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा; टीएमसी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, वाहनांवर दगडफेक

Kalyan Crime : 'मी माझ्या बायकोला मारून आलो'; हैवान नवऱ्यानं ९ वर्षांच्या मुलासमोरच बायकोचा जीव घेतला

SCROLL FOR NEXT